Home यवतमाळ तारिक साहिर लोखंडवाला यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एन्ट्री.

तारिक साहिर लोखंडवाला यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एन्ट्री.

459
यवतमाळ : मुंबई येथे अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत राज्यमंत्री तथा पालक मंत्री गोंदिया आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या सहमतीने यवतमाळ जिल्ह्याचे कार्याध्यक्ष तारिक साहिर लोखंडवाला यांचे निलंबन मागे घेत त्यांना पक्षात परत घेऊन पक्ष बळकट करण्याची तयारी दर्शविली,
त्यांचे निलंबन मागे घेतल्याचे पत्र आज रोजी प्रदेश उपाध्यक्ष वसंतरावजी घुईखेडकर यांच्या निवासस्थानी तारिक लोखंडवाला यांच्या बंधूंना देण्यात आले, पत्र देतांना मा. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, मा. जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, माजी सभापती अरुण राऊत ,उत्तमराव गुल्हाने शहराध्यक्ष लाला राऊत , कलीम पटेल, शहेबाज खान, बिलाल साहिर, करिम खान व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, लोखंडवाला यांच्या परत आल्याने कार्यकर्त्यात जल्लोषाचा वातावरण निर्माण झाले आहे.