Home विदर्भ मुस्लिम समाजात मजबूत पकड ठेवणारे समाजसेवक माहेफुज कुरेशी, “सर्व पक्षांच्या नजरा केंद्रस्थानी”

मुस्लिम समाजात मजबूत पकड ठेवणारे समाजसेवक माहेफुज कुरेशी, “सर्व पक्षांच्या नजरा केंद्रस्थानी”

1003
वर्धा / आर्वी :- होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजातील प्रभावी समाजसेवक माहेफुज कुरेशी हे राजकीय समीकरणात निर्णायक भूमिका बजावतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. समाजात त्यांची लोकप्रियता, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी थेट संपर्क या तिन्ही गोष्टींमुळे सर्व पक्षांच्या नजरा सध्या कुरेशी यांच्या हालचालींकडे लागल्या आहेत.
गोर-गरीब, रुग्ण आणि गरजूंचा आधार
अखेरच्या काही वर्षांपासून माहेफुज कुरेशी यांनी कोणत्याही पद किंवा अपेक्षेशिवाय सामाजिक कार्याचा ध्यास घेतला आहे. स्वखर्चाने रुग्णांना मदत, गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप, शैक्षणिक सहाय्य आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. अनेक वेळा आपत्कालीन प्रसंगी ते मदतीसाठी अग्रभागी दिसतात, ज्यामुळे मुस्लिम समाजातच नव्हे तर इतर समाजातही त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला आहे.
राजकीय समीकरणात ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता
नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या विजय-पराभवाचे अंतर माहेफुज कुरेशी ठरवू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुस्लिम समाजातील त्यांची मजबूत पकड आणि सर्व स्तरांवर असलेले जनसंपर्क यामुळे त्यांच्या पाठिंब्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणत्या पक्षाकडे कुरेशी यांचा झुकाव राहणार, याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
समाजसेवा आणि सौहार्दाचे प्रतीक
माहेफुज कुरेशी हे केवळ मुस्लिम समाजाचे नेते नसून सर्व समाजात सौहार्द, एकोपा आणि मदतीची भावना जपणारे समाजसेवक म्हणून ओळखले जातात. “राजकारण हे सेवा करण्याचे साधन असले पाहिजे, सत्तेचे नव्हे,” अशी त्यांची भूमिका असून, ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.
एकूणच, येत्या नगर परिषद निवडणुकीत माहेफुज कुरेशी यांची भूमिका केवळ समाजसेवकापुरती मर्यादित राहणार नसून, स्थानिक राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सर्व पक्षांच्या राजकीय रणनीतीत आता माहेफुज कुरेशी हे महत्त्वाचे समीकरण बनले आहेत, यात शंका नाही.