Home यवतमाळ सात हजारांवर विद्यार्थी देणार मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती परीक्षा

सात हजारांवर विद्यार्थी देणार मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती परीक्षा

183

आज जिल्ह्यातील १२ केंद्रांवर परीक्षा

यवतमाळ : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या आईच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.०’ अंतर्गत परीक्षेचा तिसरा टप्पा उद्या रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात पार पडणार आहे.
जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक विद्यार्थी १२ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा देणार आहेत.

ही योजना विशेषतः महाराष्ट्र राज्यातील १२ वी उत्तीर्ण झालेल्या बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असून, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे . या योजनेअंतर्गत, निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना १० हजार रूपये शिष्यवृत्ती, नामांकित विदर्भ आयएएस अकॅडमी मार्फत ऑनलाइन स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन आणि अभ्यास साहित्य घरपोच दिले जाणार आहे .

या योजनेबद्दल बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले, “बंजारा समाजातील एकही होतकरू विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रशासकीय सेवेत समाजाचा टक्का वाढावा, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे”.

यवतमाळ जिल्ह्यातील परीक्षा केंद्र आणि संबंधित तालुक्यात विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी जिल्ह्याभरात एकूण १२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालय/राणी लक्ष्मीबाई विद्यालय (यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, वणी, मारेगाव, झरीजामणी, राळेगाव)

आर्णी येथील श्री. म. द. भारती विद्यालय आर्णी, घाटंजी, केळापूर, पांढरकवडा, नेर येथील नेहरू महाविद्यालय, तसेच दारव्हा येथील नगरपरिषद शाळा क्र. २, शिवाजी हायस्कूल आणि विरजी भीमजी घेरवरा हायस्कूल येथे परीक्षा होणार आहे.

दिग्रस येथील दिनबाई विद्यालय आणि मोहनाबाई कन्या शाळा,पुसद येथील कोपरेकर विद्यालय, गुणवंतराव देशमुख विद्यालय आणि शिवाजी विद्यालय आणि महागांव येथील मातोश्री विद्यालय महागांव, उमरखेड येथे ही परीक्षा होणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी ८५३०३७०६७४ किंवा ८६६८९२०५५२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.