Home विदर्भ पत्रकारांच्या जाहिरातीच्या नावावर केले पैसे गोळा; अवैध व्यावसायिकांकडून ‘सुविधा शुल्क’?

पत्रकारांच्या जाहिरातीच्या नावावर केले पैसे गोळा; अवैध व्यावसायिकांकडून ‘सुविधा शुल्क’?

410

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात पत्रकारांच्या जाहिरातीच्या नावाखाली एका विशिष्ट शासकीय विभागाने पैसे जमा केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे पैसे विविध अवैध व्यवसायिकांकडून, त्यात रेत माफिया, दारू विक्रेते, तसेच इतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांकडून गोळा करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या किंवा माध्यमांच्या जाहिरातीच्या नावाखाली हे ‘सुविधा शुल्क’ स्वरूपात पैसे मागितले. जाहिरात छापण्यासाठी मदत, नकारात्मक बातम्या थांबवणे किंवा विरोधात न जाण्याची हमी देणे – अशा स्वरूपाची ‘सेवा’ देण्यासाठी ही रक्कम घेतली गेल्याची चर्चा आहे.
सदर विभागाचे नाव, तसेच संबंधित अवैध व्यावसायिकांची नावे पुढील अंकात स्पष्टपणे उघड केली जातील,

हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन आणि कायदा यंत्रणांवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. एका बाजूला शासन अवैध धंद्यांवर बंदी घालण्याचे आदेश देत असताना, दुसऱ्या बाजूला त्याच शासन यंत्रणेमधील काहीजण त्यातून पैसे कमावत असल्याचा हा प्रकार गंभीर चिंता निर्माण करणारा आहे.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा वापरून जर कोणी अशा प्रकारे पैसे गोळा करत असेल, तर यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.