Home यवतमाळ यवतमाळ शहरातील नागरिकांचे 49 हरविलेले मोबाईल यवतमाळ शहर पोलीस स्टेशनने केले परत

यवतमाळ शहरातील नागरिकांचे 49 हरविलेले मोबाईल यवतमाळ शहर पोलीस स्टेशनने केले परत

353

यवतमाळ – पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतुन पोलीस व जनता यांच्यात संबंध वृददीगंत करण्याकरीता पोलीस समन्वय हि संकल्पना राबविण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मोबाईल वाटप आयोजन करण्यात आले.

पो.स्टे. यवतमाळ शहर येथे तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्या बाबत तक्रार दिलेल्या होत्या तक्रारदार यांचे मोबाईलचा शोध CEIR पोर्टलचा पोलीस स्टेशन यवतमाळ शहर स्तरावर वापर करुन शोध घेण्यात आला त्यामध्ये एकुण ४९ मोबाईल किंमत अंदाजे ९,००,०००/- रुपयांचा मुददेमाल तक्रारदार यांना पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या आदेशाने पो.नि. रामकृष्ण जाधव यांच्या हस्ते परत करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात सा, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन यवतमाळ शहर ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव पोलीस अंमलदार रविंद्र नेवारे, अंकुश फेंडर यांनी पार पाडली.