Home महत्वाची बातमी बाजीच्या ठाव्याने मारहाण करून केली आई-वडिलांची हत्या

बाजीच्या ठाव्याने मारहाण करून केली आई-वडिलांची हत्या

590

 

अमिन शाह

बुलढाणा : अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील गणेश महादेव चोपडे या खुनी मुलाने वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कौशल्याबाई महादेव चोपडे यांचा खून केल्याची थरारक घटना समोर आली आहे.

जिल्ह्यात खुनाच्या घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून गुन्हेगारीचा आलेख उंचावला आहे.अमडापूर हद्दीतील किन्ही सवडदच्या थरारक घटनेने या गुन्हेगारीत भर घातली आहे.या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. गणेश महादेव चोपडे या खूनी मुलाने हिस्सेवाटी वरून वाद घातल्याचे समजते. घरगुती वाद विकोपाला जाऊन गणेशने आपल्याच आई-वडिलांना बाजीच्या ठाव्याने मारहाण करून त्यांचा जीव घेतला.आई व वडीलांचे वय 70 ते 75 दरम्यानचे होते.