Home यवतमाळ शरद मैंद हे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उमेदवार…

शरद मैंद हे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उमेदवार…

530

यवतमाळ – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मधील नेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर विदर्भात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्याचे नाव शरद अप्पाराव मैंद असे आहे.

मैंद यांनी विधानसभा 2025 नामदार इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी अ.प.) यांचे विरुद्ध निवडणूकही लढवली होती.

जनतेमध्ये चर्चेला उधाण

गणपतीचा प्रकोप – शरद मैद यांचेवर गणपती नाराज असल्याचे पुसदच्या जनतेत बोलल्या जात आहे. प्रत्येक वेळी गणेश उत्सव काळात मैद यांचे वर खरे खोटे असे काही आरोप लागले आहे. मागे गणेश उत्सव काळात मैंद यांचा वाहन चालक वाढवे यांच्या आत्महत्येमुळे शरद यांच्यावर संशय निर्माण झाला होता.

राजकीय ग्रहण-

पुसदच्या राजकारणामध्ये नाईक यांचे वर्चस्व अबाधित आहे, 2025 या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद चंद्र पवार गटाकडून शरद मैंद यांनी उमेदवारी मिळवून निवडणुकीत चुरस असल्याचे भासविले होते परंतु मोठ्या फरकाने मैंद यांचा पराभव झाला व पुसद अर्बन बँकेत असलेले नगर परिषद कर्मचाऱ्यांचे खाते एसबीआय बँकेत वळविण्यात आले व राजकीय चढाओढीची लढाई इथून सुरू झाली अशी देखील चर्चा पुसदच्या जनतेमध्ये जोरदार सुरू आहे.