Home जळगाव पति पत्नीचा वाद विकोपाला गेल अन विपरितच घडलं हो ,

पति पत्नीचा वाद विकोपाला गेल अन विपरितच घडलं हो ,

780

 

अमिन शाह

 

रावेर तालुक्यातील निंभोरा गावात कौटुंबिक वादातून एका महिलेने पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रात्री घडली असून, यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. निंभोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. सततच्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या संदर्भात पोलिस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार
निंभोरा येथील रहिवासी तथा न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी (वय-६५) आणि त्यांची पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्य हाजराबाई हुसेन तडवी (वय-५५) यांच्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असत. घटनेच्या रात्रीही त्यांच्यात असच कडाक्याच भांडण झाल. या भांडणातून राग अनावर झाल्याने हाजराबाईने कुऱ्हाडीने हुसेन तडवी यांच्यावर वार केले. वार इतके जबरदस्त होते की या घटनेत हुसेन तडवी यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी हाजराबाईला ताब्यात घेतले असून, तिची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर पोलीस नाईक अविनाश उत्तम पाटील यांनी दिली आहे. तपास उपनिरीक्षक अभय ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक दिपाली पाटील हे करीत आहेत.