
अमिन शाह
खोट्या प्रेमाचा बनाव करून त्याला घरी बोलावले व ब्लात्काराची धमकी देत पति पत्नीने लाखोने लुटले ही घटना
अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर येथे उघडकीस आली आहे. पती-पत्नीने मिळून एका व्यक्तीला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवत तब्बल १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळली. मात्र, लालसेला सीमा नसल्याने आरोपींनी पुन्हा ५ लाखांची मागणी केली आणि अखेर पोलीसांच्या सापळ्यात रंगेहाथ पकडल्या गेले.
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
१६ जून २०२५ रोजी फिर्यादी स्टेट बँक ऑफ इंडिया, टॉवर चौक अकोला येथे पैसे जमा करण्यासाठी गेले असता त्यांची ओळख एका अनोळखी महिलेशी झाली. त्या महिलेनं आपले नाव लता नितेश थोप (वय ३०, रा. खरबढोरे, ता. मुर्तिजापूर) असे सांगितले. थोड्या वेळातच तिने फिर्यादीचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला वारंवार कॉल करीत संपर्क साधू लागली. सुरुवातीला फिर्यादीने तिचे कॉल टाळले. मात्र, नंतर तीने सांगितले की तिचा पती तिला त्रास देतो, ती त्याच्याशी नीट वागत नाही,मारझोड़ करतो आणि तिला फिर्यादीशी बोलायला आवडते. एवढ्यावरच न थांबता तीने फिर्यादीला सांगितले की तिचा पती काही दिवस बाहेरगावी आहे, त्यामुळे “तुम्ही माझ्या गावी या” असे आमंत्रण दिले. त्या नुसार फरयादी
२ जुलै रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान फिर्यादी खरबढोरे गावातील आरोपी महिलेच्या घरी गेले. तेथे दोघे बोलत असतानाच अचानक तिचा पती नितेश प्रभाकर थोप (वय ३९) आला. त्याने थेट विचारले …”तू माझ्या बायकोसोबत काय करत आहेस?” यानंतर त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून धमकावले की, “आत्ताच मी तुझ्या घरी फोन करतो आणि सांगतो की तू माझ्या बायकोवर जबरदस्ती करत आहेस.” इतकंच नव्हे तर, त्याने फिर्यादी व पत्नीचा एकत्र फोटोही काढला. नंतर दोघांनी मिळून फिर्यादीला धमकी दिली …३ लाख रुपये लगेच आणून द्या, नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तुमची बदनामी करू.”
फिर्यादी बदनामीच्या भीतीने सुरुवातीला ३ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर आरोपी दाम्पत्याने वेळोवेळी धमक्या सुरू ठेवल्या आणि रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून मिळून तब्बल १८ लाख ७४ हजार रुपये त्याच्या कडून उकळले.
३० ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादीला पुन्हा धमकी आली, ५ लाख रुपये नाही दिले तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करू, तसेच नातेवाईक व शेजाऱ्यांमध्ये बदनामी करू…. त्या नंतर फिर्यादीने पोलिसांना कळवले की आणि सर्व हकीकत सांगितली पोलिसांनी सापळा रचला त्याच्या कडे फक्त १ लाख रुपये जमा झाले आहेत, आणि तो ते देण्यासाठी मुर्तिजापूरला येणार आहे.
मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. फिर्यादीकडून १ लाख रुपये घेतल्यानंतर आरोपी दाम्पत्य मुर्तिजापूर-अकोला रोडवरील टोलनाक्या जवळ रंगेहाथ पकडले दोन्ही आरोपींना रोख रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्या गुन्ह्यातील सक्रीय सहभागाची खात्री पटल्याने त्यांना अटक करण्यात आली.
या खळबळजनक खंडणी प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. चंदन वानखडे करीत असून, त्यांना स.पो.नि. श्रीधर गुठे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.











































