Home मुंबई मनोज जरांगें पाटलाच्या आंदोलनासाठी किट्टी आडगाव येतील महिला सरसावल्या, चुलीवर भाकरी थापटून...

मनोज जरांगें पाटलाच्या आंदोलनासाठी किट्टी आडगाव येतील महिला सरसावल्या, चुलीवर भाकरी थापटून तब्बल १०००० भाकरी पाठवल्या.

350

मुंबई – सुशांत आगे
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणी मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत.
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील आमरण उपोषण
आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. आता माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील गावातील नागरिकांनी व महिलानी मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी सरसावल्या आहेत. चुलीवर भाकरी थापटून तब्बल १०००० भाकऱ्या व टेचा, चटणी मुंबईच्या दिशेने महिलांनी पाठवल्या आहेत.या व्यवस्थेत मुस्लीम समाजाचाही मोठा पुढाकार दिसून येत आहे.दरम्यान, कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे हाल झाले होते. अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिले होते. तर ‘एक भाकर समाजासाठी’ हे ब्रीद घेऊन किट्टी आडगाव येथील मराठा बांधव भाकरी, चपाती, चटणी, ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले.