Home यवतमाळ प्रतिभा फाउंडेशन ने नवजीवन वृद्धाश्रम नेर येथे सदिच्छा भेट देऊन केली मदत.

प्रतिभा फाउंडेशन ने नवजीवन वृद्धाश्रम नेर येथे सदिच्छा भेट देऊन केली मदत.

394

यवतमाळ -0संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था वाळकी रोड वटफळी द्वारा नवजीवन वृद्धाश्रम नेर येथे प्रतिभा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता तेथे एकूण 36 महिला आणि पुरुष असे वृद्ध वास्तव्य करत आहे त्यांच्यासोबत प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार यांनी हितगुज साधून त्यांच्या जीवनाची,आरोग्याबद्दल, त्यांच्या घराबद्दल , त्यांना काय त्रास आहे, अशा प्रकारची चर्चा करून त्यांना जाणून घेतले, एक वृद्धांना वक्र खराब झाल्यामुळे चालता येत नव्हते त्यामुळे लगेच मी त्यांना माझ्याकडून वॉकर घेऊन द्या असे सांगितले तसेच एका महिलेला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना दिसत नाही त्यामुळे त्यांचा वर पण उपचार करून परत दिसायला लागेल असे प्रयत्न करू असे आश्वासन प्रतिभा पवार यांनी दिले,या वृद्धाश्रम मध्ये खूप छान सोय होत आहे आणि कुठलाच त्रास नाही असे सर्व वृद्धांनी सांगितले,तसेच अतुल पवार आणि सचिन शेळके यांनी सुद्धा वृद्धांसोबत हितगुज केले आणि हे वृद्धाश्रम श्री सतीश उरकुडे, मिसेस उरकुडे, प्रवीण उईके, वनिता भोयर हे सर्व खूप मेहनत आणि निस्वार्थ भावनेने या वृद्धांची सेवा करत आहे प्रतिभा फाउंडेशन कडून यांचे स्वागत करण्यात आले आणि भविष्यात प्रतिभा फाउंडेशन आपल्याला मदत करत राहील असे आश्वासन फाउंडेशन च्या वतीने फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार यांनी दिले. आणि प्रतिभा पवार यांनी सर्व समाजाला असे आव्हान केले की या नवजीवन वृद्धाश्रम नेर इथे एकदा भेट देऊन थोडी मदत करावी. यावेळी फाउंडेशन च्या अध्यक्ष प्रतिभा पवार, सचिव सचिन शेळके, कोषाध्यक्ष अतुल पवार हे उपस्थित होते. यावेळी सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना खूप समाधान वाटले.