
यवतमाळ – महाबोज चे मा. व्यवस्थापकीय संचालक, श्री. योगेशजी कुंभेजकर (भा.प्र.से) यांनी दिनांक ०१.०२.२०२५ रोजी लोणी ता. नेर जि. यवतमाळ तसेच चानी कामठवाडा ता. दारव्हा जि. यवतमाळ या भागातील गहु व हरभरा पिकाच्या विविध वाणांच्या प्रक्षेत्राला भेटी देऊन पाहणी केली व बिजोत्पादकांच्या अडचणी जाणुन घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
या प्रसंगी श्री. अरविंद राधाकृष्ण ठोकळ रा. कामठवाडा ता. दारव्हा जि. यवतमाळ यांच्या गहु पी.डी.के. व्ही सरदार या प्रक्षेत्रा बद्दल विशेष समाधान व्यक्त केले, तसेच श्री. अनिल साहेबराव पाटील रा. जवळगाव ता. नेर यांच्या महाबीज ऊती संर्वर्धीत केळी जी-९ बाबत माहिती जाणुन घेतली.
यावेळी महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री. जी.जी. देशमुख, जिल्हा व्यवस्थापक श्री.व्ही. व्ही देशमुख, कृ.क्षे.अ. कु.एम.आर. कुमरे, महाबीजचे भागधारक व बिजोत्पादक श्री. अनिल पाटील तसेच श्री. अरविंद ठोकळ, श्री. ओमप्रकाश ठोकळ, श्री. विनोद गुल्हाने, श्री. अजय डवले, श्री. अरविंद मैघने, श्री. माधव जाधव, श्री. मनोज जुबळे, श्री. उमेश लांडे, श्री. बजरंग नागदेवते, श्री. मिलींद ठोकळ तसेच चानी कामठवाडा व लोणी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































