Home यवतमाळ ए.एस.आय.श्रावण राठोड पाचव्यांदा सन्मानित..

ए.एस.आय.श्रावण राठोड पाचव्यांदा सन्मानित..

512

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार
—————————————
यवतमाळ – जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कडून सन्मान करण्यात येतो.यातच बाभुळगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विविध कामामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यासाठी प्रत्येक कार्याचे दखल घेतल्या जाते.यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने त्यांची प्रंशंशा करून सत्कार केल्या जातो.बाभुळगाव पोलीस स्टेशनला कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देवून पाचव्यांदा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या सत्काराने हेड मोहरर श्रावण राठोड यांची सर्वत्र स्तरातून प्रशंसा केली जात असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.