Home मराठवाडा कलियुगाचा प्रकोप वाढला… विवाहित प्रेमीयुगुलांनी मृत्यूला कवटाळले

कलियुगाचा प्रकोप वाढला… विवाहित प्रेमीयुगुलांनी मृत्यूला कवटाळले

79
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना , दि. २० :- विवाहित असलेल्या दोन युवक युवतींचे प्रेमसंबंध निर्माण होवून दोघांनीही झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील हनुमान नगर येथे मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

विशेष म्हणजे दोघेही विवाहित असून दोघांनाही दोन मुले आहेत.या संदर्भात पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,अंबड तालुक्यातील रवाना येथील तीस वर्षीय विवाहीत अजय श्रीधर मोरे आणि एक बावीस वर्षीय विवाहित युवती लालवाडी येथील एका शेतात असल्याची माहिती शनिवारी अंबड पोलिसांना समजली यावरून पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी वचननामा लिहून दिला की, आमच्या दोघांचेही विवाह झालेले असून दोघांनाही दोन मुले आहेत.परंतु तरिही आमचे प्रेमसंबंध आहेत.असे नमुद केलेले आहे.या वचननाम्यावर दोघांच्याही सह्या आहेत.असा वचननामा पोलिसांना लिहून दिल्याचे समजते.या नंतर या दोन्ही युवक युवतीं हनुमान नगर परिसरात शेती काम करण्यासाठी गेले.काल मंगळवारी हनुमान नगर परिसरात एका झाडाला या दोघांनी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली .त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सिडी शेवगण, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस उपनिरीक्षक शेजूळ यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी भेटी दिल्या.

Unlimited Reseller Hosting