
चिमुकल्यांनी केली खरी कमाई.
————————————-

घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या पारवा येथिल जिल्हा परिषद कन्या शाळेत विध्यार्थिनींना लहानपणापासूनच कौशल्य विकास अभ्यासक्रमांची ओळख करून द्यावी, त्याचप्रमाणे विध्यार्थिनींना कामाचा अनुभव मिळावा, शालेय स्तरापासून शिक्षण उद्योगाभिमुख करण्यात यावे आदी मुद्द्याच्या अनुषंगाने शाळेमध्ये खरी कमाई आनंद मेळावा उपक्रम दिनांक १६ डिसेंबर रोज मंगळवारला उत्साहात पार पडला.
आयोजित बाल आनंद मेळाव्यात विविध प्रकारचे खाद्य वस्तू तयार करून त्याची विक्री शाळा स्तरावर केली गेली. पारवा जिल्हा परिषद कन्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आले असून विध्यार्थिनींनी विविध प्रकारची दुकाने(स्टॉल)लावली होती.
या कार्यक्रमाचे उदघाटक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत ठाकरे होते.प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर व रत्ना नैताम पालकवर्ग तथा गावातील गणमान्य मंडळी व बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.उपस्थितांनी विध्यार्थिनींकडून विविध पदार्थाची खरेदी करून आस्वाद घेतला व सर्वांनी विक्रीस असलेल्या पदार्थाची प्रशंसा केली. यामुळे विध्यार्थिनींना फारच आनंद मिळाला. खरी कमाई या उपक्रमांतर्गत विध्यार्थिनी हेच मालक व ग्राहक बनले होते. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रीतून ४ ते ५ हजार रुपयाची उलाढाल झाली.या उपक्रमच्या माध्यमातून विध्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच उद्योग, धंदा, दैनंदिन व्यवहार, खरेदी – विक्रीचा अंदाज यासह अन्य माहिती देण्यात आली. मुख्याध्यापिका गीता मानकर व रत्ना नैताम यांनी याबाबत विध्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी माता पालक व उपस्थितांना शिक्षणाचे महत्व घर घर संविधान याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले.शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांची उपस्थिती होती. विध्यार्थिनींनी आणलेल्या सर्व खाद्य पदार्थाची गावाकऱ्यांनी अतिशय उत्साहात खरेदी केल्या व खाद्य पदार्थाची विक्री झाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.











































