
अमिन शाह
बुलढाणा
साखरखेर्डा येथील जेष्ठ पत्रकार अशोक इंगळे यांची राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व व वृक्ष मित्र स्व. मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तथागत सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून एका नयनरम्य सोहळ्यात राज्यातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशोक इंगळे हे गेली ३० वर्षांपासून अधिक काळापासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून या काळात त्यांनी आपली लेखणी वंचित, पिडीतांना, निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी गुंड आणि हिंसक प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी अविरतपणे झिजवून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या समाजाभिमुख व परोपकारी कार्याची दखल घेऊन उपरोक्त संस्थेने त्यांना * राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून ता.-१९- नोव्हेंबर रोजी एका भव्य दिव्य कार्यक्रमात खास मान्यवरांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार अशोक इंगळे यांना जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे साखरखेर्डा प्रेस क्लबचे डी. एन्. पंचाळ, संतोष गाडेकर, दिलीप खंडारे, सचिन खंडारे, अमीन शाह, समाधान सरकटे, प्रल्हाद देशमुख, दर्शन गवई, गणेश पंजरकर, गजानन इंगळे, अशोक खरात सह अ.भा. ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, भाजपा नेते तथा ग्रा. सदस्स उल्लास देशपांडे उपसरपंच सैय्यद रफिक, शिवसेना नेते महेंद्र पाटील, माजी सरपंच दाऊद कुरेशी, इब्राहिम शाह आदींनी अभिनंदन केले आहे.











































