Home यवतमाळ पुसद अर्बन बँक अध्यक्ष शरद मैंदविरुद्ध गुन्हा दाखल

पुसद अर्बन बँक अध्यक्ष शरद मैंदविरुद्ध गुन्हा दाखल

1065

कंत्राटदार मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्येचे प्रकरण

यवतमाळ – कंत्राटदार पेनमाथा बैंकटेश्वर वर्मा ऊर्फ
मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणात पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बैंक अध्यक्ष शरद मैद विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात जमीन मिळाल्यावर आता शरद मैद विरोधात ६.६८ कोटींच्या फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल झाला आहे.
यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेने १७ सप्टेंबर रोजी मैद आणि आरोपी मंजीत वाडे यांना अटक केली होती. तांत्रिक कारणावरून न्यायालयाने मैदला पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडीत पाठवले. नंतर जामीन मंजूर करण्यात आला. वर्मा यांच्या आत्महत्येच्या चौकशी दरम्यान, मैदने डमी लोकांना कोठ्चवधी रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे पोलिसांना आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी कंत्राटदार चंद्रसेन यादव यांची चौकशी केली. यातून पुसद बैंक आणि भारती मैद पतसंस्थेने फसवणूक समोर आली. यादवने २०१३ मध्ये भारती मैंद पतसंस्थेत कर्जासाठी अर्ज केला होता. शरद मैदने यादव यांना साक्षीदार म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड असलेल्या १२ लोकांना आणण्यास सांगितले. यादव नऊजणांना ल्यांचे आधार आणि पॅन कार्डसह शरद मैदकडे घेऊन
कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी घेत कर्ज मंजूर
मार्च २०२५ मध्ये, जेव्हा यादव यांना पैशांची गरज होती, तेव्हा ते पुन्हा शरद मैदकडे गेले, मैदने त्यांना पॅन आणि आधार कार्ड असलेले सहा साक्षीदार आणण्यास सांगितले. कोऱ्या कागदांवर त्यांच्या स्वाक्षरी घेत यादवला १.२५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आणि १ कोटी ८ लाख रुपये देण्यात आले. मैदने मुन्ना वर्माला बनावट लोकांच्या नावाने कर्ज देऊन त्याचे शोषण केल्याची माहिती यादवला होती. यादव यांनी एका बैंक अधिकाऱ्याला विचारपूस केली. अधिकाऱ्याने उघड केले की यादवने आणलेले १२ लोक साक्षीदार नव्हते तर कर्जदार होते.
शरद मैंदने कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या मिळवून त्यांना परत पाठवले.
यादव किंवा त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदारांना कर्जाची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
वर्मा यांच्या आत्महत्येच्या तपासात असे दिसून आले की यादवने साक्षीदार म्हणून सादर केलेल्या १४ हडमी लोकांच्या नावावर एकूण ६.६८ कोटींचे कर्ज जारी करण्यात आले होते. त्यानंतर यादवने फसवणुकीची तक्रार दाखल केली, यादव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि मैदला अटक करण्यात आली.