Home विदर्भ समाजातील लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण – प्रा. डॉ. वैशाली...

समाजातील लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण – प्रा. डॉ. वैशाली गुडधे

309

शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारीता विभागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या वुमेन्स स्टडीज सेंटरला भेट

समाजातील लैंगिक असमानता दूर करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरच्यासं चालक प्रा. डॉ. वैशाली गुडधे यांनी केले.

 अमरावती – श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथील जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरला भेट दिली. या वेळी “जेंडर, मीडिया अँड कल्चर” या विषयावर चर्चा व संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. मनीष भंकाळे यांनी विद्यार्थ्यांचा परिचय करून देत भेटीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. डॉ. वैशाली गुडधे यांनी प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरूप, स्त्रियांच्या प्रश्नांवरील वार्तांकन तसेच केंद्राच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. भगवान फाळके यांनी सेंटरची पार्श्वभूमी आणि प्रगतीवर प्रकाश टाकला, तर डॉ. महेंद्र मेटे यांनी क्षेत्रभेटीचे महत्त्व अधोरेखित केले.

या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे सहभाग नोंदविला. प्रसारमाध्यमांद्वारे महिला सक्षमीकरण व लिंगभाव संवेदनशीलता वाढीस लागते, तसेच चित्रपट-मालिकांमधील स्त्रियांचे चित्रण यावरही चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीष भंकाळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. रुपेश फसाटे यांनी केले.