Home यवतमाळ यवतमाळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवे नेतृत्व

यवतमाळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवे नेतृत्व

369

यवतमाळ  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यवतमाळ जिल्हा अध्यक्षा वर्षाताई निकम यांनी यवतमाळ शहर राष्ट्रवादी च्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेश नावडे यांची निवड केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्यरत असलेल्या जितेश नवाडे यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कार्यात नवी ऊर्जा व दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील युवकांना संघटित करून, स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षविस्तारासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीमुळे यवतमाळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम व बळकट होईल, असा विश्वास जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्तविला आहे.

👉 जीतेश नवाडे यांची शहराध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.