Home यवतमाळ काका” च्या “ठेकेदार” कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला “राजीव साहेबां”ची खास हजेरी

काका” च्या “ठेकेदार” कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला “राजीव साहेबां”ची खास हजेरी

385
ग्रामीण भागातील जनता मात्र वाऱ्यावर
यवतमाळ – दारव्हा तालुक्यातील ग्रामीण विकासाची जबाबदारी असलेल्या पंचायत समितीत सध्या ठेकेदार व राजकीय पुढाऱ्यांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. विकासकामांपेक्षा ठेकेदारांची हौस, नाद व नौका यातच अधिक वेळ घालवला जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत अधिकारीवर्ग ठेकेदारांच्या सेवेत मश्गूल असल्याचे नागरिकांच्या तोंडी ऐकू येते.
अशा परिस्थितीत एक वेगळीच घटना घडली. पंचायत समिती कार्यालयात नागरिकांना वारंवार टोलवणारे आणि वेळ न देणारे राजीव साहेब मात्र ठरलेल्या वेळी एका ठेकेदार पुढाऱ्याच्या खासगी कार्यालयात थाटामाटात पोहोचले. कारण होते काकांच्या “लाडक्या” “प्रविण्य” प्राप्त ठेकेदार कार्यकर्त्याचा वाढदिवस!
या वाढदिवसाला इतरही ठेकेदार मंडळींनी विषेश उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे ठेकेदार आरामात खुर्चीवर बसलेला असताना साहेब मात्र उभ्याच अवस्थेत हजेरी लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावरूनच ठेकेदारांच्या पुढे प्रशासन किती नतमस्तक झाले आहे, याची प्रचिती सर्वांना आली.
ग्रामीण भागातील साधारण नागरिकांना पंचायत समितीच्या कार्यालयात “राजीव साहेब” क्वचितच भेटतात. अनेकदा तासन्तास रांगेत उभे राहूनही त्यांची कामे होत नाहीत, तक्रारींचे निवारण होत नाही. मात्र ठेकेदारांच्या कार्यक्रमासाठी साहेब वेळ काढतात आणि वेळेवर पोहोचतात, हे नागरिकांना खूपच खटकत आहे.
यामुळे जनतेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून “साहेब आमच्यासाठी नाही, तर ठेकेदारांसाठीच काम करतात का?” असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. पंचायत समितीवर ठेकेदारांचा पगडा वाढत चालल्यामुळे ग्रामीण विकासात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार बोकाळला आहे.शासनाचा विकासाचा खरा उद्दिष्ट मात्र मागे पडला असल्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे.