Home विदर्भ ब्रह्मपुरीत जनसुरक्षा विधेयक विरोधात विशाल आक्रोश मोर्चा

ब्रह्मपुरीत जनसुरक्षा विधेयक विरोधात विशाल आक्रोश मोर्चा

284

जनसुरक्षा विधेयक रद्द करा .जनतेची मागणी

चंद्रपूर / ब्रह्मपुरी – जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ब्रह्मपुरीच्या वतीने ८ ऑगस्ट २५ रोजी आले. आंदोलनात समता सैनिक दल,पत्रकार, वकील, शिक्षक,योजना कर्मचारी, शेतकरी, युवक यांच्यासह बहुजन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारक येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली सर्व प्रथम नगरपरिषद परिसरातील l छत्रपती शिवाजी महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करून विशाल मोर्चाची सुरुवात करण्यात आले. जनसुरक्षा विधेयक रद्द करा, शेजाऱ्यांची कर्ज माफी करा,विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्ती तात्काळ द्या या मागण्याचे घोषणा देत तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो संविधान जिंदा बाद अशा घोषणांनी संपूर्ण ब्रम्हपुरी शहर दुमदुमले .विशेष म्हणजे जनसुरक्षा विधायक विरोधात जिल्ह्यात प्रथम आंदोलन ब्रम्हपुरीत करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथून मोर्चाची सुरुवात होऊन मोर्चा सम्राट अशोक चौक, रेणुका माता चौक, मर्दानली चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,असे मार्गक्रम करीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.सभेचे अध्यक्ष डॉ.. प्रेमलाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या मोर्चाची पार्श्वभूमी आणि सभेचे प्रास्ताविक मोर्चाचे निमंत्रक प्रशांत डांगे यांनी केले. तर कॉ.विनोद झोडगे यांनी जनसुरक्षा विधेयक कसे अन्यायकारक आहे जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले तर आपण आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी लढा उभारू शकत नाही आपण गुलाम झाल्याशिवाय. राहणार नाही असे विस्तृत मार्गदर्शन केले.या सभेला खेमराज तिडके,जीवन बागडे, डॉ. राजेश कांबळे,अशोक रामटेके,प्रभू लोखंडे, कॉ. महेश कोपुलवार, इत्यादी नी सभेला संबोधित केले सभेचे संचालन सुधाकर पोपटे तर आभार लिलाधर वंजारी यांनी केलेत. त्यानंतर माननीय महामहीम राज्यपाल महाराष्ट्र शासन यांना तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.या विशाल आक्रोश मोर्चा करिता ब्रम्हपुरी तालुक्यातील समता सैनिक दलाचे सैनिक,शेतकरी, नागरिक ,महिला विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. तसेच या मोर्चा करिता संपूर्ण भाजप सरकार विरोधी समविचारी पक्ष ,संघटनांनी सहभाग घेतला.
या मोर्चाच्या यशस्वी करिता डेव्हिड शेंडे, मोंटू पिलारे,विहार मेश्राम,स्वप्नील राऊत