Home यवतमाळ चिंतामणी नगरीत खुलेआम मटका काऊंटरचा बाजाराला आशीर्वाद कुणाचा?.

चिंतामणी नगरीत खुलेआम मटका काऊंटरचा बाजाराला आशीर्वाद कुणाचा?.

338

कळंब पोलिसांचे दुर्लक्ष

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानीही खुली सुट दिल्याची चर्चा.

जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष घालणार का?

कळंब :- जिल्ह्यातील शांतता प्रिय असलेल्या देवाच्या कंळब नगरीत कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असुन टाऊन खुलेआम मटका काऊंटर सुरू असल्याने शांतता भंग पावली आहे.

कंळब पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात खुलेआम मटक्याचा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मटक्याच्या काऊंटरवर गर्दी होवु लागली आहे. एकीकडे यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेत स्वंतत्र पथके निर्माण केले असुन हे पथकही कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

कंळब मध्ये सुरू असलेल्या मटका काउंटर बंद करण्यात यावे बऱ्यापैकी लोकांनी प्रयत्न केला परंतु अपयशी ठरले. विदर्भाच आराध्य दैवत असलेल्या चिंतामणी नगरात अवैध दारू व मटक्याचे खुलेआम काऊंटर पाहता कंळब तालुक्यात पोलीस स्टेशनच नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे. अशा परस्थितीत एखादा अनुचीत प्रकार घडल्यास या सर्व घटनानां जबाबदार कोण असे मत सुज्ञ नागरिकांकडुन व्यक्त करण्यात येत.

यवतमाळ शहरात येणाऱ्या
अवैध रेती वाहतुकीच्या वसुलीसाठी एकाची नेमणुक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रभर रेतीची वाहतुक सुरू असते. यवतमाळ शहरातील ठोक विक्री करणार्या दारू दुकानदाराने एकाची नेमणुक केली असुन दरदिवशी टेम्पोने दारू गावा गावतील अवैध दारू विक्री करणाऱ्याकडे पाठविली जात आहे. तसेच सुगंधित तंबाखू चे विक्री करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही.या सर्व अवैध व्यवसायचे खरच समुळ उच्चाटन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता करतील का? याकडे लक्ष लागले आहे.

संग्रहित छायाचित्र