Home नाशिक त्या विकृत नराधम तरुणाने केला गाई वर अत्याचार ,

त्या विकृत नराधम तरुणाने केला गाई वर अत्याचार ,

27

 

अमीन शाह

राज्यात दिवसो दिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून आता ह्या घटना मुक्या जनावरा सोबत ही घडत असल्याचे दिसत आहे ,
आता नाशिक मधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. २६ वर्षीय तरुणाने चक्क एका मूक्या गाई वर अत्याचार केल्याचं वृत्त समोर येत आहे. आरोपीने निष्पाप गाईचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका २६ वर्षीय तरुणाने परिसरात असलेल्या एका गाईवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संशयित विकृत तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली.
संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चक्रधर नारायण ठाकरे वय २६ वर्ष असे आरोपीचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. चिडलेल्या नागरिकांनी संशयित आरोपीला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ,