Home यवतमाळ आयुष्यातील प्रत्येक क्षणांना कॅमेराबध्द करणार्‍या छायाचित्रकारांचा यथोचित सन्मान व्हावा – आमदार मदन...

आयुष्यातील प्रत्येक क्षणांना कॅमेराबध्द करणार्‍या छायाचित्रकारांचा यथोचित सन्मान व्हावा – आमदार मदन येरावार

34

नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची उपस्थिति…! 

यवतमाळ – भावे मंगल कार्यालयात ३०,३१ व १ सप्टेंबर अशा तीन दिवसीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन यवतमाळ- फोटो हा प्रत्येक व्यक्तीला आवडणारी गोष्ट आहे. फोटो काढणे आवडणार नाही असा कुणीही सापडणार नाही, प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना आपल्या कॅमेर्‍यामध्ये टिपणार्‍या छायाचित्रकारांचा यथोचित गौरव व सन्मान व्हायला पाहिजे असे उदगार यवतमाळ विधानसभेचे आमदार मदनभाऊ येरावार यांनी व्यक्त केले. यवतमाळ येथे आज दिनांक ३० ऑगष्ट रोजी झालेल्या कॉटनसिटी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर सामाजिक संस्थेव्दारा आयोजित छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन प्रसंगीत ते बोलत होते. स्थानिक भावे मंगल कार्यालयात ३०,३१ व १ सप्टेंबर अशा तीन दिवसीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉटनसिटी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर सामाजिक संस्थेव्दारा आयोजित छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष मा. नितीनजी खर्चे साहेब प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थचे माजी अध्यक्ष श्री.मधुकररावजी काठोळे हे होते तर उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता होते. तर प्रमुख उपस्थितीत यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे ज्येष्ठ फोटोग्राफर संतोष डोमाळे, प्रविण पाटील,अरुण चंद्र,विनय कोठारी, कॉटन सिटी स्पर्धा प्रदर्शनीचे प्रकल्प प्रमुख निखील डगवार, विशेष उपस्थिती होती.
कॉटनसिटी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर सामाजिक संस्थेव्दारा आयोजित छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ.मदन येरावार पुढे म्हणाले की, छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर हे सुध्दा समाजातील एक प्रमुख घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे व ज्यांनी आपल्या आनंदाच्या क्षणाला कॅमेराबध्द केले आहे, ते अतुलनिय आहे.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. यात व्यावसायीक गटातून प्रथम क्रमांक सौरभ जवंजाळ, अमरावती, व्दितीय क्रमांक विशाल खरे, अमरावती, तृतीय क्रमांक शरद पाटील, कोल्हापूर, हौशी गटातून प्रथम क्रमांक संदीप नार्लावार, घाटंजी, व्दितीय विशाल बडे, अमरावती, तृतीय धनराज कंडलाख्, पंढरपूर यांची नावे मंचावरून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जाहीर केलीत. ही छायाचित्र प्रदर्शन युवकांना प्रेरित करतील असे उदगार काढले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल लोहकरे (कोषाध्यक्ष) , तर संचालन चंद्रबोधी घायवटे व आभार प्रदर्शन चंदन आंधळे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मयूर भुरे, संजय भोयर, स्वप्नील थुल, शुभम धारगावे, आशिष दुपारे, राजन वाडेकर, निलेश वंजारी, इमरान शेख , राजू रंगारी,रोहिदास राठोड,उज्वल बोरकर ,देवा रामटेके,शंतनू अलोने,प्रवीण सोनटक्के,अंकित गुजर,प्रेमानंद,सोनू शेख,प्रशांत शेटे,आदित्य नंदुरकर,श्रीकांत तिजारे,मनीष माहुरे,पप्पू अन्सारी,रोहन ढोले, ,आदींनी परिश्रम घेतले.