Home जालना एस्क्रो खात्यातील जमा पैसा गुंतवणूकदारांना वाटप करण्याची मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेची मागणी

एस्क्रो खात्यातील जमा पैसा गुंतवणूकदारांना वाटप करण्याची मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेची मागणी

24

जालना/लक्ष्मण बिलोरे

-मैत्रेय ग्रुप कंपनीच्या मालमत्तेचा जमा पैसा एस्क्रो खात्यात जमा आहे. हि जमा रक्कम परताव्यासाठी आतूर असलेल्या गुंतवणूकदार लोकांना वाटप करण्यात यावा अशी विनंती मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी संघटनेच्या वकिलांनी मुंबई कोर्टात केली आहे.
मैत्रेय ग्रुप कंपनी १९९८ साली ठाणे शहरात प्रथम स्थापण झाली.भविष्यकाळातील आर्थिक तरतूद म्हणून एक बचतीचा मार्ग म्हणून राज्यातील गोरगरीब लोकांनी मैत्रेय ग्रुप कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनीधींमार्फत ठराविक कालावधीत व्याजासह परतावे देण्याच्या अटींनुसार लाखों लोकांनी मैत्रेय मध्ये गुंतवणूक केली. मैत्रेय ग्रुप कंपनीने ठराविक कालावधीत परतावे देण्यास सुरुवात केल्याने लोकांचा विश्वास वाढला. मैत्रेय कंपनीने १५ ते १६ वर्षे प्रामाणिकपणे व्यवहार केला.या माध्यामातून मैत्रेयने कोट्यावधी रूपयांची मालमत्ता जमवली, जमिन खरेदी,बांधकाम क्षेत्रात, विविध व्यवसायात गुंतवणूकदार लोकांचा जमा पैसा गुंतवून प्रगतीचा उचांक गाठला,मैत्रेय मधील सिनियर पदावरील लोकांनी गुंतवणूकदारांच्या कमिशनवर लाखोंची कमाई करून घेतली,महागड्या गाड्या घेतल्या,बंगले बांधले,काही सिनियरांनी मैत्रेय मालमत्ता नावे करून घेतली आणि गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडून दिले.दरम्यान, २०१५-१६ च्या वर्ष अखेरीस मैत्रेय ग्रुप कंपनीच्या संचालक मंडळाची नियत बिघडली. मैत्रेय ग्रुप कंपनीची सिएमडी वर्षा सत्पाळकर हिचा भाऊ प्रसाद परूळेकर याने संचालक मंडळाला हाताशी धरून मैत्रेय ग्रुप कंपनी बंद पाडली.मैत्रेय कंपनीचा कारभार सुरळीतपणे सुरू असतांना अचानक मैत्रेय बंद पडल्याने गुंतवणूकदार हैराण झाले. मैत्रेय संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले, अटक झाली, काही जेलमध्ये आहेत ,काहीची जामीनवर सुटका झालेली आहे तर दस्तुरखुद्द सिएमडी वर्षा सत्पाळकर जामिन मिळवून फरारी आहे…सदर मैत्रेय प्रकरण मुंबई शेशन कोर्टात सुरू आहे. गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी संघटनेने पिडित गुंतवणूकदार लोकांना परतावे मिळावेत अशी एकमेव मागणी कोर्टात केलेली आहे .केस क्रमांक ११४८/२०२२ असा आहे.गुंतवणूकदारांना परतावे सरळ त्यांच्या बँकेखात्यात जमा व्हावेत यासाठी नाशिक येथे एस्क्रो खाते उघडण्यात आलेले आहे. १३जून २०२४ रोजी मुंबई कोर्टात मैत्रेय प्रकरणाची तारिख झाली त्या तारखेला गुंतवणूकदार संघटनेच्या वकिलांनी कोर्टात विनंती केली की,सध्या एस्क्रो खात्यात जी रक्कम जमा आहे,त्याची वाटप गुंतवणूकदारांना करावी.संघटनेच्या वकिलांच्या विनंतीची दखल कोर्ट निश्चितपणे घेवू शकते असा विश्वास संघटनेला आहे.तसेत मैत्रेयच्या सहा नोटीफिकेशन मधील मालमत्ता विक्रीची परवानगी मागीतली.त्यानूसार परताव्याची पुर्व तयारी म्हणून गुंतवणूकदारांनी आपले नाव,आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकडिटेल्स एक्सएल सिटमध्ये संघटनेकडे दाखल करावे ,असे आवाहन संघटनेच्या अध्यक्षांसह कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.