Home यवतमाळ यवतमाळ कारागृहात योगदिनानिमीत्य बंद्यांनी केला सराव.

यवतमाळ कारागृहात योगदिनानिमीत्य बंद्यांनी केला सराव.

17

सौ.आरती गोसटकर कारंजेकर

देवळी (प्रतिनिधी) आज सकाळी 7.00 वाजता जागतिक योगदिना निमीत्य, पतंजली योग समिती, यवतमाळ यांच्या मार्फत यवतमाळ जिल्हा कारागृहामधील बंद्यांकरिता योगशिबारांचे आयोजन करून बंद्यांना योगासनाचे फायदे व महत्व पटवुन देवुन त्यांच्या मध्ये योगाबाबत जागृती केली.
तसेच बंद्यांना नियमितपणे स्वतः हुन योगसने करण्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती यवतमाळचे श्री. दामोधर ठाकरे, श्री. सुबोध रॉय, श्री. राजदीप जयस्वाल, डॉ. दर्शना वरगंटीवार, सौ. विनोदा चिद्दरवार, कु. मोनाली ठाकरे यांनी सहकार्य केले. योग अभ्यास दरम्यान यवतमाळ जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्री. एस. एस. ठाकरे, तुरूंगाधिकारी डी.एस. हुलगुंडे, श्री. माधव खैरगे, अॅङ स्वप्निल कुलकर्णी, मुख्य लोकअभिरक्षक व
कारागृह कर्मचारी उपस्थित होते.