Home यवतमाळ चिखलवर्धा येधील माजी सैनिक सैयद अब्दुलशाह गाझी यांची वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकी...

चिखलवर्धा येधील माजी सैनिक सैयद अब्दुलशाह गाझी यांची वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्या प्रकरणी, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून निर्दोष मुक्तता..!

88

➡️ घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांचे आदेश..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 8 एप्रिल : घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येधील माजी सैनिक सैयद अब्दुलशाह गाझी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ” मै तुम्हारा कबसे नाटक देख रहा हुं, यहाँ आरोपी हजर है! पंचनामा फाड दो और यहाँ से चले जाओ, नही तो एक एक का गेम बजा डालुंगा!” अशी धमकी दिल्या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात भादंवि 186, 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास कुर्ली बिटचे जमादार राजीव गिरडकर यांनी केला होता. सदर प्रकरणात पारवा पोलीसांनी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकार पक्षाकडुन पांच साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी आरोपी सैयद अब्दुलशाह गाझी (चिखलवर्धा) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी सैयद अब्दुलशाह गाझी यांचेतर्फे ॲड. सैयद मुखतार अली, यवतमाळ (ॲड. एस. एम. अली, यवतमाळ) यांनी बाजू मांडली. तर, सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रिती इंगळे यांनी काम पाहिले.

घाटंजी तालुक्यातील पारवा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातंर्गत कुर्ली बिटचे वनपाल कृष्णा धनसिंग राठोड व वन विभागाचे कर्मचारी हे चिखलवर्धा येधील रोही शिकार प्रकरणात 20 जुन 2015 रोजी सकाळी 7.30 वाजता फरार आरोपींना अटक करण्यासाठी चिखलवर्धा येथे गेले होते. मात्र, आरोपी मिळुन आले नाही. परंतु, आरोपी हे गावात असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

फिर्यादी वनपाल कृष्णा धनसिंग राठोड हे चिखलवर्धा ग्रामपंचायत कार्यालयात बसुन असतांना आरोपी सैयद अब्दुलशाह गाझी हे स्वतःहुन ग्रामपंचायत कार्यालयात येऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्देशुन म्हणाले की,
” मै तुम्हारा कबसे नाटक देख रहा हुं, यहाॅ आरोपी हजर है! पंचनामा फाड दो और यहाँ से चले जाओ, नही तो एक एक का गेम बजा डालुंगा.” अशी धमकी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे आरोपी माजी सैनिक सैयद अब्दुलशाह गाझी (वय 58, रा. चिखलवर्धा ता. घाटंजी) यांचे विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात भादंवि 186, 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास कुर्ली बिटचे जमादार राजीव गिरडकर यांनी करुन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे वनपाल कृष्णा धनसिंग राठोड, कय्युमखान शमीउल्लाखान, श्रीकृष्ण येसनसुरे, कुर्ली बिटचे वनरक्षक नरेंद्र मस्के या पांच साक्षीदार यांना तपासले. मात्र, सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

आरोपी सैयद अब्दुलशाह गाझी यांना भादंवि 186, 506 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच आरोपीला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437 -अ च्या अनुपालनाकरिता आरोपीने पुढील सहा महिन्यांकरीता रक्कम ₹ 15,000 चा जामीन कदबा देण्याचे आदेश घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी दिले आहे.