Home बुलडाणा उद्योगमंत्री उदय सामंत्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केंव्हा ?

उद्योगमंत्री उदय सामंत्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केंव्हा ?

90

 

आमदार रायमुलकर यांनी लक्षवेधीद्वारे खामगावातील गैरप्रकार आणला चव्हाट्यावर…

वर्षभरात खत निर्मिती नाही

 

बुलडाणा ,

नागरिकांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेला बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील कचरा संकलन व व्यवस्थापणाचा विषय १७ मार्च रोजी थेट विधानसभेत गाजला. आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे हा मुद्दा सभागृहात सविस्तरपणे मांडून या समस्येचे गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर देत खामगावातील कचरा व्यवस्थापणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची व तो करीत असलेल्या सदोष कामाची महिन्याभरात चौकशी समिती स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर चौकशी करुन त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या घोषणेला २२ दिवसाचा अवधी उलटला तरी अद्याप[हि चौकशी समिती खामगावात पोहचली नसल्याने मंत्यांच्या आदेशाला केल्राची टोपली तर दाखवल्या गेली नाही ना ? अशी चर्चा आता व्हायला लागली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा गत आठवड्यात विधानसभेत गाजला. मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी लक्षवेधीद्वारे हा विषय विधानसभेत मांडत यातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणले. खामगाव शहरात नियमितपणे घंटागाडीद्वारे कचरा संकलन होत नाही. डम्पिंग ग्राऊंडवर संकलित झालेल्या कचऱ्याला वारंवार आगी लागतात. यामुळे विषारी धूर परिसरात पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. कचऱ्यापासून खत बनविण्याची जबाबदारी असताना गेल्या वर्षभरात याठिकाणी कोणतेही खत तयार झालेले नाही. खत निर्मिती न करता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लावली जाते, असा आरोप होता. कचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण होण्यासाठी शहरातील सबकॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचे रायमुलकर यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. कचरा संकलनाचे मूळ कंत्राट घेतलेल्या कंत्राटदार स्वतः हे काम न करता सबकॉन्ट्रॅक्टरमार्फत केले जाते. मात्र हा सबकॉन्ट्रॅक्टर व्यवस्थितरीत्या काम करीत नसल्याने खामगावात ही समस्या गंभीर बनली आहे.तरी त्वरित संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक महिन्याच्या आत या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्यवस्थापनाचा चौकशी करून दोषींवर कारवाई केली आहे.जाईल, असे आश्वासन दिले होते.
मात्र या घोषणेला २२ दिवसाचा अवधी उलटला तरी अद्याप[हि चौकशी समिती खामगावात पोहचली नसल्याने आमदार रायमूलकरांच्या तक्रारीला आणि उद्योग मंत्र्यांच्या आदेशाला केल्राची टोपली तर दाखवल्या गेली नाही ना ? अशी चर्चा आता व्हायला लागली आहे…