Home जळगाव चार हजाराची मागली लाच खिरोदा तलाठी कोतवाल एसीबीच्या सापळ्यात

चार हजाराची मागली लाच खिरोदा तलाठी कोतवाल एसीबीच्या सापळ्यात

135

रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी यांनी सातबारा उतार्यावर वारसांच्या नोंदणीसाठी चार हजार लाच स्वीकारताना तलाठी सह कोतवाल एसीबीच्या सापळ्यात

चार हजार रुपयांची लाच मागण्यासह ती स्वीकारणा-या तलाठ्यासह कोतवालास जळगाव एसीबीच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आज आली. प्रमोद प्रल्हाद न्हायदे असे रावेर तालुक्याच्या खिरोदा येथील तलाठ्याचे आणि शांताराम यादव कोळी असे कोतवालाचे नाव आहे. सात बारा उता-वार तक्रारदाराच्या मयत भावाची पत्नी आणि मुलगा यांचे नाव लावण्याच्या बदल्यात चार हजाराची लाच तक्रारदाराकडून मागण्याचे काम तलाठी व कोतवाल या दोघांनी केले होते. तसेच लाचेची मागणी स्वीकारण्याचे काम तलाठी न्हायदे यांनी कोतवालासमक्ष खिरोदा तलाठी कार्यालयात केले.
लाचेची मागणी आणि स्वीकार होताच एसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु केली. पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. के. बच्छाव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.