Home यवतमाळ कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त बालरोग निदान शिबिर सपन्न

कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त बालरोग निदान शिबिर सपन्न

109

कळंब तालुका प्रतिनिधी :- राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ व मुस्लीम सेवा संघ यांच्या सयुक्त विदयमानाने भगवान श्री महाविर जयंती निमित्त कात्री येथे दि ४ एप्रिल रोजी बालरोग निदान शिबिर सपन्न झाले.

या शिबिरात यवतमाळ येथील बालरोगतज्ञ डॉ हरिश तांबेकर यांनी बालकांची तपासणी करून मोफत औषध दिली .
या प्रसंगी राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक ( दै लोकदुत कळंब तालुका प्रतिनिधी) रूस्तम शेख ,प्रियंका वाल्दे , अंगणवाडी सेविका चंदाताई आत्राम , गजानन निकोडे, सागर शुक्ला, कामिलं शेख जिल्हा सचिव ऑल इंडिया राहुल गांधी कॉग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा इ उपस्थित होते
शिबिर यशस्वी होण्या करीता दै कळंब नगरीचे जिल्हा प्रतिनिधी जावेद खान , मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जावेद अली , इश्वरभाऊ कोठारी ,अमोल चावरे, अविनाश राठोड,धिरज मडावी , चंदाताई आत्राम अंगणवाडी सेविका , दै सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी विजयभाऊ बुंदेला यांचे मोलाचे सहकार्य लाभले . त्या बद्दल आयोजक रूस्तम शेख यांनी आभार व्यक्त केले