Home पालघर ग्रामपंचायत कौलाळे लोकनियुक्त सरपंच वैशाली अशोक धोडी यांच्या हस्ते फणस पाडा, भगत...

ग्रामपंचायत कौलाळे लोकनियुक्त सरपंच वैशाली अशोक धोडी यांच्या हस्ते फणस पाडा, भगत पाडा पाईप लाईन चे भूमिपूजन

78

जव्हार  ( सोमनाथ टोकरे ) – :जव्हार तालुक्यातील नामवंत ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक दोन फणसपाडा भगत पाडा 21 मार्च 2023 रोजी जल जीवन मिशन योजना अंतर्गत लोकनियुक्त सरपंच वैशाली अशोक धोडी, उपसरपंच शंकर काशिनाथ मेढा, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप निकुळे, दिनेश कलिंगडे,ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पाईपलाईनचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे वार्ड क्रमांक दोन मध्ये फणसपाडा,भगत पाडा, या मतदारसंघात येत असून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कौलाळे ग्रामपंचायतीस ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट रात्र दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत होती ती आता समस्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून दूर होईल असे सरपंचांनी बोलताना सांगितले.तसेच कौलाळे ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी सरपंच मॅडम चे कौतुक केले तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले .आणि लवकरच संपूर्ण पाईपलाईनचे काम पूर्ण करून लोकांना घरापर्यंत नळ पोहोचणार पाईपलाईन उद्घाटन प्रसंगी उपस्थित माजी सरपंच राजेश वातास, ग्रामपंचायत सदस्य दिनेश कलिंगडे, एकनाथ कलिंगडे, माजी सरपंच सुभाष मूर्थडे, प्रदीप निकुळे, भास्कर जाबर, उपसरपंच शंकर मेढा, शंकर कलिंगडे, सुनील वातास, मनोज गवते, कैलास धोडी,नाथा कलिंगडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.