Home बुलडाणा नवऱ्यासाठी बायको चढली मोबाईल टॉवर वर ,?

नवऱ्यासाठी बायको चढली मोबाईल टॉवर वर ,?

199

 

टॉवरवर चढणाऱ्या महिलेचे शोले स्टाईल आंदोलन ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

मेहकर येथे आज एका महिलेने तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून आपल्या पतीवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या केसेस रद्द करण्यात याव्या आरोपाखाली अशी मागणी केली.
येथून जवळच असलेल्या सारंगपूर गावात राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाला निवेदन दिले होते की, पतीवरील खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन करू. महिलेने दिलेल्या निवेदना नुसार मी सारंगपूर येथे राहते व माझे पती गजानन बोरकर हे खाजगी वाहनावर वाहन चालक म्हणून काम करतात पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात केला आहे. बोरकर यांच्यावर पोलिसांनी तत्काळ कोणताही तपास न करता खोटा गुन्हा दाखल केला त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला माझ्या पतीवर दाखल झालेला विनयभंगाचा खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी या महिलेने शोले स्टाईल आंदोलन केले झालेल्या आंदोलना मुळे पोलीस प्रशासनाची दमछाक झाली, तहसीलदार, तहसील कर्मचारी, पोलीस अधिकारी सर्व टॉवरसमोर जमा झाले होते , पोलिसांच्या आश्वासनानंतर सुमारे अडीच तासानंतर महिलेने आपले आंदोलन संपवले आणि ती टॉवर च्या खाली आली.