Home यवतमाळ जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

95

यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्यामुळे व पाणी मुबलक प्रमाणात नळाद्वारे येत नसून अपुऱ्या पाण्याचा

होणारा त्रास येथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याकरिता आज दिनांक 10मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष ढवळे जिल्हा प्रमुख,विनोद पवार शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात महिला आघाडी तर्फे जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ येथे भोसा डेहनकर लेआऊट मधील समस्त नागरिक महिला यांनी मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण यवतमाळ याना निवेदन देण्यात आले.
जीवन प्राधिकरण नियमित पाणीपुरवठा हा खंडित झाला आहे.या भागात पिण्याच्या पाण्या करीता आहाकार निर्माण झाले आहे.जीवन प्राधिकरनाची पाइपलाइन अनियमित बंद अवस्थेत असल्याने दूषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकाच्या पोटाचे आजार वाढले असून आता उन्हाळा सुरू झाला असल्याने पाण्या करीता या भागाकडे स्थानिक प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असून पाण्या करीता नागरिकांची भटकती इतरत करावी लागत आहे. या भागातील अनेक लोकांनी महिन्याचे बिल भरले असून सुद्धा त्यांना पाणी टंचाई चां सामना करावा लागत आहे. या मुळे त्रस्त नागरिकांनी शिवसेना शहर अध्यक्ष विनोद पवार यांच्याकडे या प्रश्न करीता धाव घेतली यावेळी त्यांनी संतोष ढवळे व समस्त पदाधिकरी तसेच परिसरातील नागरिक जीवन प्राधिरण कार्यालय वरती धडक मोर्चा घेऊन गेले. व निवेदन देऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी अधिकाऱ्यानं कडून घेतले.या मोर्चा मध्ये शेख युनूस, सौ.नम्रता चव्हाण,सौ.क्रांती शर्मा अनेक नागरिक उपस्थिती होते.