प्रतिनिधी -प्रमोद झिले वर्धा, हिंगणघाट
नागपूर हैद्राबाद महामार्गावरील गाव येरला, आम्ही भाग्यवान यासाठी की राष्ट्रीय महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील शेवटचे टोकावर वसलेले येरला गाव पण नेहमी दूर्लक्षीत.महामार्ग झाला पण प्रवाशांच्या नशिबी वाईट दिवस आले जो मार्ग दळणवळणासाठी वरदान ठरत होता तो मात्र वाहतूकदारांसाठी शाप ठरत आहे.राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे असंख्य जनता बळी पडली. कूणाचे कूंकू पूसले तर कूणाचा धनी गेला.त्याचाच प्रत्यय दि.६ मार्चला आला येरला जवळील वर्धा नदीचे पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने अवघ्या काही वर्षांत पूलावरील जांईट खिळखिळे झाले व जांईटचे काम करण्यासाठी जांईट खोदण्यात आले व ६ ते ७ काम न करता एकेरी वाहतूक येरला फाट्यावरून वळती करण्यात आली.एकेरी वाहतूकीमूळे दि.६ मार्चला डोरला येथील रहिवासी कवडू हिवरे या इसमाला ट्रकने जबर धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले व त्यांना सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले परंतु चार दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर दि.१०मार्चला त्यांचा मृत्यू झाला.मृत्यूची बातमी कळताच येरला व डोरला परिसरात शोककळा पसरली. अशाप्रकारेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेळेचे बंधन करून काम करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
अपघात झाल्यास वाहतूक शाखेचे शून्य सहकार्य
वाहतूक शाखा कार्यवाहीस सक्त असून वाहतूक शाखेची टीम नेहमी येरला फाट्यावर उभी असते, नियमात न बसणार्या वाहन चालकांना चालान व चिरीमिरी द्यावी लागते तसेच टोल सूद्धा भरावा लागतो पण अपघात झाल्यास सूविधा मात्र शून्य मिळतात.