Home महत्वाची बातमी प्रसिद्ध चित्रपट अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या मुलीवर गुन्हा दाखल

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या मुलीवर गुन्हा दाखल

192

अमीन शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांची मुलगी अभिनेत्री हिबा शाह यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील पशु रुग्णालयात हिबानं महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री हिबा शाह हिची मैत्रीण सुप्रिया शर्मा हिने तिच्याकडे असलेल्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी पशु रुग्णालयातील डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. तिला रूग्णालयात जाणं शक्य नसल्यानं तिनं हिबाला दोन्ही मांजरी घेऊन जाण्यास सांगितलं. सुप्रियाच्या दोन्ही मांजरींना घेऊन हिबा रुग्णालयात गेली होती.
रुग्णालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हिबाला पाच मिनिटं थांबण्यास सांगितले. सर्जरी सुरू असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी तिला दिली. काही वेळ गेल्यानंतर हिबाला राग अनावर झाला. तिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर आरडाओरड करायला सुरूवात केली. मांजरींची सर्जरी करण्यापूर्वी कागदपत्रांवर स्वाक्षरी मागितल्यानंतरही हिबा संतापली. तिने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. परत जाण्यास सांगितल्यानंतर तिने क्लिनिकच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला होता. १६ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी रुग्णालयानं पोलिसांत तक्रार दाखल केली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यावरून वर्सोवा पोलिसांनी हीबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.