Home महत्वाची बातमी चक्क पोलीस ठाण्यावरच चोरट्यांनी मारला डल्ला

चक्क पोलीस ठाण्यावरच चोरट्यांनी मारला डल्ला

22
0

नगदी 7 लाख व 85 मोबाईल ची चोरी

अमीन शाह

कोल्हापूर , दि. 12 :- जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी अलमारी तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे ज्या पोलीस ठाण्यावर आमच्या मालमत्तेची रक्षणाची जवाबदारी असते त्याच पोलीस ठाण्यात चोरट्यांनी चोरी करून लाखो चा माल लंपास केला आहे या घटनेमुळे सर्वत्र पोलिसांच्या बाबतीत चर्चा केली जात आहे ,
या संदर्भात मिळालेळ्या माहिती नुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले 185 मोबाईल व नगदी सात लाख रुपये स्टोर रूम मधल्या अलमारीत ठेवले होते गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टोर रुम मध्ये शिरून हा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महोमद पटेल यांच्या तक्रारी वरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

ज्या पोलीस ठाण्यावर आमच्या मालमत्ते च्या रक्षणाची जवाबदारी असते त्या पोलीस ठाण्यात चोरी झाल्या मूळे आश्चर्य वयकत केले जात आहे सुरवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता अशी चर्चा लोकात केली जात आहे .

Unlimited Reseller Hosting