Home मराठवाडा भरधाव वेगात कर्कश आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या वर पोलिसांची कार्यवाही

भरधाव वेगात कर्कश आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या वर पोलिसांची कार्यवाही

65
0

वाहने जप्त…!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०६ :- आज शहेरात सिटी चौक पोलिसांनी भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या तसेच कर्कश आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या वाहन धारका वर कार्यवाही करून वाहने जप्त केली आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील सिटी चौक या भागात आज महोमद अली 23 औरंगाबाद , शेख मुद्स्सीर 23 रा जालना औरंगाबाद यांनी त्यांच्या ताब्यातील वाहने नंबर mh 02 0101 व mh15 5444 ही भरधाव वेगात चालवीत होते व कर्कश आवाजात हॉर्न वाजवून परिसरातील शांतता भंग करीत होते या वरून पोलिसांनी दोघा विरोधात दंडात्मक कार्यवाही करून वाहने जप्त केली आहे ही कार्यवाही पोलीस निरीक्षक ऐ , पी , तांगडे , तथा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे ,या पुढे शहरात शांतता भांग करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहे ,

विक्रेत्यांवर कार्यवाही व्हावी…

शहेरात अनेक ठिकाणी सहज पणे खुलेआम चायना मेड कर्कश आवाजाच्या हॉर्न विकण्यात येत आहे त्या विक्रेत्यांवर कार्यवाही केल्यास आपो आपच वाहन धारकावर याचा धाक बसेल व शहेराची शांतता अबाधित राहील अशी मंगणी शहर पर्यावरण प्रेमीनि केली आहे .