
सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटीकांना आगी लागतात की लावल्या जातात?
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील रोपवाटिकांना आगी लागतात की लावल्या जातात? या बाबतीत सिंदखेडराजा येथील अमृतवन रोपवाटिका जळाल्यानंतर आता पुन्हा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील ५ हेक्टर
मधील ५५५५ रोपे जळून खाक झाल्यानंतर सुद्धा सामाजिक वनीकरणाच्या वरीष्ठांची कुंभकर्णीय झोप उडत नाही यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन कहाळे यांना मुख्यवनसरंक्षक अधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल
करुन त्यांना जाग करावं लागतं व अजूनही चौकशी लावली जात नाही? वास्तविक अमृतवन जळलं किंवा जाळलं त्यानंतरच्या तक्रारीनंतरच चौकशी लागली असती तर निमगाव वायाळ येथील ५ हेक्टर मधील रोपे वाचली असती.परंतु तालुक्यातील सर्वच प्लांटेशन मध्ये घटनास्थळावर एकही रोपे नसल्याने कुणीतरी तक्रार करणार असल्याची माहिती मिळाल्यावर संबंधितांनी हा प्रकार केला असल्याची चर्चा जोराने आहे.लागोपाठ दुसऱ्यांदा घटना घडल्याचा पुरावाच सर्व काही बोलतो. तालुक्यातील वनपरीक्षेत्र सिंदखेडराजा अंतर्गत मौजे निमगाव वायाळला जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ५ हेक्टरवर ५५५५ रोपे शासनाने मोठ्या कष्टाने मेहनतीने उभारलेल्या प्लांटेशन मध्ये संबंधितांनी केलेला भ्रष्टाचाराच्या आगीचा वणवा उठला छोट्या सजीव,वन्यजीव, पशु,पक्षी, प्राणी,तसेच वृक्ष आगीत होरपळून खाक झाले.या अगोदर नुकतेच सिंदखेडराजा येथील काळापाणी अमृतवन रोपवाटिका जाळल्या नंतरही आपलं कुणीच काहीच बिघडवत नाही याच गुर्मीने संबंधितांनी निमगाव वायाळ येथे सुद्धा त्याच प्रकारची पुनरावृत्ती केलेली आहे.मात्र अजूनही वरिष्ठांचा याकडे कानाडोळा आहे.दालमे कुछ काला है अशीही चर्चा सुरू झाली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी व वृक्षारोपणासाठी शासनाचा लाखो रुपायांचा निधी खर्च होत आहे.आणि यंत्रणांवर होणारा खर्च वेगळाच.
सजीव सृष्टीचे सौंदर्य,
वैभव धुळीत मिसळवून आपल्या वरील भ्रष्टाचाराचे आरोप लपविण्यासाठी व पाप गंगेत धुऊन काढण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.प्रामाणिकपणे निपक्ष व उच्चस्तरीय चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईलच पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या प्लांटेशन ची निर्मिती करून ५ हेक्टर मध्ये ५५५५ रोपे लावून निर्मिती करण्यात आली होती २०२३ पासून आतापर्यंत ती कुणाची जबाबदारी होती? व या वनाला संरक्षण करण्यासाठी सुद्धा शासनाने मंजूरी दिलेली असतांना सुद्धा मात्र आग लागलीच कशी हा प्रश्न कळीचा आहे?आग लागली कीं लावली याबाबत सत्य समोर येणही गरजेच आहे.
जनतेचे व माध्यमांचे यावर लक्ष्य आहे.बघावे लागणार या आगीमध्ये नक्कीच खूप मोठ सत्य दडलेले आहे अशी शंका सुद्धा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. २०२३ पासून २०२६ पर्यंत शासनाने लाखो रुपये खर्च करूनही प्लांटेशन जळत असतील व शासन निधीचा अपव्यय होत असेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करून उपयोग काय? त्याच्यावर काहीच जबाबदारी नाही कां?असा ज्वलंत प्रश्न जनमानसातून केला जात आहे.जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार जर मार्चच्या आगोदर जलाई जाळरेषा किंवा वाढलेलं गवत कापून जर नियमांप्रमाणे कामं झाली असती तर हा प्रकारच घडला नसता मात्र तसें न करत बोगस खोटे नाटे बिल कार्यालयाकडे सादर झाल्याने आपला भ्रष्टाचाराच पितळ उघड पडू नये म्हणूनच हा प्रकार संबंधितांनी केलेला असल्याची दाट शंकेची चर्चा होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात वृक्षलागावडीच्या बाबतीत बट्याबोळ असल्याने आपला भ्रष्टाचार दाबण्यासाठीच हा नवीन प्रकार शोधला असल्यामुळे या सर्वंच प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व तपासणी करून या बाबत संबंधितांकडून वारंवार जलाईच्या गंभीर घटना घडत असून शासन निधीचा खूप मोठा अपव्यय झाला असल्याने तो संबंधिताकडूनच पूर्ण वसुल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या करता सामाजिक कार्यकर्ते गजानन कहाळे यांनी लेखी स्वरूपात थेट CCF अमरावती यांचेकडे तक्रार केलेली असून मा.वनमंत्री व वनमंत्री सचिव मंत्रालय मुंबई व वनप्रधान व वनबल नागपूर तसेच आयुक्त अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांना याबाबत निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहे.
त्यामुळे आता या संदर्भात अखेर काय कार्यवाही होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.












































