Home यवतमाळ डॉ.नीरज वाघमारे यांची वंचितच्या गटनेतेपदी निवड..

डॉ.नीरज वाघमारे यांची वंचितच्या गटनेतेपदी निवड..

82

यवतमाळ – नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, एड-आनंद गायकवाड, आणि सौ.मीरा रामदास वीर हे नगरसेवक म्हणून निवडून आलेत. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत डॉ. नीरज वाघमारे यांना गटनेतेपदी निवड करावी असा ठराव पक्षाने घेतला असून त्यानुसार मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी नगरपरिषदेतील वंचित बहुजन आघाडीचा गटनेता म्हणून डॉ.नीरज वाघमारे यांची अधिकृतपणे निवड करून नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

याप्रसंगी डॉ. नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष, तथा नगरसेवक, एड.आनंद गायकवाड, नगरसेवक, सौ मीरा रामदास वीर नगरसेविका, शिवदास कांबळे जिल्हा महासचिव, प्रमोद पाटील शहर महासचिव, धनंजय गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष, धम्मवती वासनिक- माजी अध्यक्षा, करूणा मून, करुणा चौधरी,अरविंद दिवे, रामदास वीर, सचिन मनवर, गुणाभाऊ मानकर, सुधाकर वासनिक, उत्तमराव कांबळे,सुधीर खोब्रागडे,दिपक वीर , वासुदेव भारसाकळे , प्रशांत भारसाकळे,अशोक कयापाक, सिद्धार्थ भवरे, शैलेश भानवे, निरंजन खडसे,संगर गायकवाड, महेश वाघमारे, इत्यादी कार्यकर्ते हजर होते.