Home महत्वाची बातमी शिंदीत चोरी दीड लाखाचे दागिने लंपास ,

शिंदीत चोरी दीड लाखाचे दागिने लंपास ,

363

 

अनेक ठिकाणी चोरीचा असफल प्रयत्न ,

अमीन शाह

बुलडाणा

साखरखेर्डा येथील
पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे शिंदी येथे काल मध्यरात्री झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला केला आहे.
प्राप्त माहितीनुसार शरद खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून असे समजते की, दि.१७/११/२०२५ रोजी रात्री अंदाजे १० वाजताचे सुमारास त्यांचा परिवार जेवन करुन हॉलमध्ये झोपले होते. रात्रीला घरातील कोणीही व्यक्ती उठली नाही, मात्र सकाळी अंदाजे सहा ते साडेसहा वाजताचे सुमारास शरद खरात यांनी उठून पाहिले असता घराचा मागील दरवाजाची कडी तुटलेली दिसली व दरवाजा ओढुन घेतलेला होता. नंतर दुसऱ्या खोलीत गेल्यावर खोलीतील लोंखडी पत्राची कोठी ही फोडलेली दिसली व त्यामध्ये ठेवलेले कपडे मला बाहेर पडलेले दिसले. काचेची खिडकी उघडलेली दिसली. त्यानंतर मागच्या बाजुच्या दरवाजाची कडी सुध्दा तोडलेली दिसली. त्यानंतर कोठीमध्ये ठेवलेले जुने १२ वर्षापुर्वीचे सोने गहु पोत सोन्याची एक तोळ्याची किमती अंदाजे २४००० हजार रुपये, गोल मण्याची सोन्याची पोत एक तोळ्याची किमती अंदाजे २५००० हजार रुपये, एकदानी सोन्याची बारा गॅमची किमती अंदाजे २१००० हजार रुपयांची असा एकुण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराच्या मागच्या दरवाजाची कडी तोडुन घरात प्रवेश करून चोरुन नेला. गावातीलच जीवन विश्वासराव खरात व अनिल भगवानराव बंगाळे यांचे सुध्दा घराच्या दरवाजाच्या कड्या तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सकाळी हा प्रकार उघडकीस होताच ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते, मात्र काही सुगावा लागला नाही. पुढील तपास सुरु आहे.

 

पोलिसांचे आवाहन ,

पोलिस स्टेशन साखरखेर्डा हद्दीतील सर्व नागरिकांना सतर्क करीत आहे की, आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी..

दिवसा/रात्री घरफोडी होण्याची शक्यता नाकारत येत नाही घराचे मागील दरवाजे कडी कोंडा तोडून दरवाजा उघडून चोऱ्या होत आहेत. घराला कुलूप लावून जताना घराला पडदा लावावा. घराला कुलूप लावून बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू तसेच पैसे घरात ठेवू नये. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्या बाबत सांगावे. घराचे मुख्य दरवाजा तसेच मागील दरवाजा साध्या कुलपा ऐवजी सेंट्रल लॉक बसवल्यास घरफोडी सारखे प्रकार होणार नाहीत. गावात चोर किंवा संशयित व्यक्ती दिवसा किंवा रात्री आल्यास लगेच पोलिसांना संपर्क करावा.
सोने पॉलिश करून देणारे कोणी फिरत असतील तर अशा माणसान घरामध्ये घेवू नये असा कोणी व्यक्ती संशयित फिरत असेल तर पोलिस स्टेशन ला कळवावे
बैंक मधे पैसे टाकणे किव्हा काढणे असल्यास आपली बॅग, पर्स, थैली याचा कडे विशेष लक्ष ठेवावे कुणाच्या भूल थापाना बळी पडू नये.
रात्रीच्या वेळेस चोर महिलांचे आवाज काढून दरवाजा उघडण्यास सांगतात नंतर घरामध्ये प्रवेश करून चोरी करतात.
आपल्या फोर व्हिलर, टू व्हिलर वाहनामधे डीकी मधे आपल्या मोल्यवान वस्तू ठेवू नये
कोणत्याही महाराजाची वेषभूषा असलेला किव्हा अनोळखी व्यक्तीना घरामध्ये घेवू नये
बस मधे चढताना उतरतांना महिलांनी आपली पर्स जपून ठेवावी तसेच पुरुषांनी आपल्या खिशामध्ये पैसे जपून ठेवावे
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी आपले दुकान, घर याठिकाणी CCTV कॅमेरे लावावे.
पोलीस प्रशासनाकडून जनतेच्या संरक्षण व मालमत्तेच्या रक्षणासाठी योग्य ती खबरदारी वेळोवेळी घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू .