Home महत्वाची बातमी सोयाबीन काढत असतांना थ्रेशर मशीन मध्ये अड़कुन युवा शेत मजूराचा मृत्यु ,

सोयाबीन काढत असतांना थ्रेशर मशीन मध्ये अड़कुन युवा शेत मजूराचा मृत्यु ,

437

 

अमिन शाह

साखरखेरडा , बुलडाणा

सोयाबिन चा हंगामा सुरु झाला असून पावसाची शक्यता असल्याने सर्व शेतकरी सोयाबीन काढण्यासाठी घाई करत आहे काल गजरखेड शिवारात एक दुखद घटना घडली असून थ्रेशर मशीन मध्ये अड़कुन एका शेत मजूराचा मृत्यु झाल्याची दुखद घटना घडली आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार साखरखेरडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गजरखेड़ येथे
आकाश कचरू देवकुळे 24 हा गावातीलच संजय बाबुराव पवार यांच्या मळणी यंत्रावर मजूर म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी देविदास मोहन रहाटे यांच्या शेतातील सोयाबीनची सुडी काढण्याचे काम सुरू असताना आकाश सोयाबीनचे काड मळणी यंत्रात सोयाबीन चा काड टाकत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो यंत्रात अडकला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आकाशच्या मृत्यूने गजरखेड गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे गणेश डोईफोडे यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे ,