Home विदर्भ तुम्ही खाताय ते खरंच पनीर आहे का?

तुम्ही खाताय ते खरंच पनीर आहे का?

385

रुपेश देशमुख ब्रह्मपुरी

चंद्रपूर – जे मांसाहारी पदार्थ खात नाहीत त्यांच्यासाठी भाज्यांसह काहीतरी चांगले खाण्याचा पनीर हा एकमेव पर्याय आहे. कोणत्याही पार्टी किंवा समारंभात, पनीरपासून बनवलेले नाश्ता पदार्थ आणि भाज्या मेनू यादीत निश्चितच समाविष्ट असतात. पण आजकाल पनीर खरेदी करताना खूप काळजी घेतली पाहिजे कारण दुकानांमध्ये उघडपणे विकले जाणारे पनीर देखील भेसळयुक्त असू शकते

आपल्या दैनंदिन आहारात पनीरला विशेष महत्त्व आहे. विशेषत हा सणासुदीच्या दिवसांत पनीरच्या भाज्या, विविध प्रकारचे स्नॅक्स आणि मिठाया बनवल्या जातात. पण हे पनीर खरेच शुद्ध आहे का, याबाबत आता शंका उपस्थित झाली आहे. कारण गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही नफेखोरांनी पनीरच्या नावाखाली बनावट पदार्थ म्हणजेच ‘चीझ अ‍ॅनालॉग’ विक्रीला आणले आहेत. मात्र खरेदी करताना शहानिशा करूनच खरेदी करावी असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे.