Home यवतमाळ उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व गावांच्या प्रचंड नुकसानीची काँग्रेस नेते माजी...

उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व गावांच्या प्रचंड नुकसानीची काँग्रेस नेते माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांची प्रत्यक्ष पाहणी

230

उमरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेती व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून गावकरीही संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय माणिकराव ठाकरे यांनी स्वतः गावागावात व शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते तातूजी देशमुख, दत्तराव शिंदे, रामदेव देवरकर, नंदकिशोर अग्रवाल, ख्वाजा भाई कुरेशी अनिल गायकवाड, यांच्यासह शेकडो स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिस्थितीचे चित्र
• किमान दोन किलोमीटर परिसर पाण्याने वेढलेला आहे.
• शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
• गावातील घरे, रस्ते, शेती व जनावरांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
• शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.

माणिकराव ठाकरे यांची मागणी

शेतकऱ्यांची व नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन माणिकराव ठाकरे यांनी शासनाकडे तातडीने पुढील मागण्या केल्या :
1. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला किमान १ लाख रुपये प्रति हेक्टर मदत तातडीने द्यावी.
2. गावातील बाधित नागरिकांना त्वरित मदत व पुनर्वसन उपलब्ध करून द्यावे.
3. नुकसानग्रस्त शेतजमिनींची व घरांची तात्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठवावेत.
4. शासनाने आधारभूत सुविधा, पाणी व आरोग्य सुविधा तात्काळ पुरवाव्यात.

काँग्रेसचा पुढाकार

या आपत्तीच्या काळात गावातील स्थानिक कार्यकर्ते पुरग्रस्तांना मदतीसाठी धावून येत आहेत. गावकऱ्यांसोबत उभे राहताना हे चित्र भावनिक करणारे आहे. उमरखेड परिसर हा सुपीक व टिकाऊ शेतीसाठी प्रसिद्ध आहे; पण या संकटामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वप्रथम या पाहणीचा पुढाकार घेण्यात आला असून शासनाने आता तरी तात्काळ निर्णय घेऊन शेतकरी व नागरिकांना मदत द्यावी, मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे