Home विदर्भ मदतीच्या बहाण्याने अंध पती समोर अंध पत्नीवर नराधमाचा अत्याचार

मदतीच्या बहाण्याने अंध पती समोर अंध पत्नीवर नराधमाचा अत्याचार

68
  • नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

अमीन शाह ,

अकोला : शहराच्या सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकावर शहराला हादरून टाकणारी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका नराधमाने पती समोरच पत्नीवर अत्याचार केल्याची ही घटना असून हे दाम्पत्य जन्मताच डोळ्यांनी आंधळ आहेय. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असे आरोपीचे नाव असून सध्या तो अटकेत आहे.

अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर अंध महिला आपल्या पतीसह रात्री पावने आठ वाजता बसमधून खाली उतरली. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना वाडेगाव इथे जाण्यासाठी जुन्या बस स्थानकावर जायचं होतंय. बस अर्धा तास उशीरा असल्यामुळे त्यात वाडेगाव परिसरात पाऊस सुरू असल्याने त्यांना तिथे जाणे शक्य नव्हतं. त्यामुळ रेल्वे स्थानकावर रात्रीचा मुक्काम करायचं दोघांचं ठरलं. त्यावेळी पत्ता विचारन्यासाठी मदतीचा हात मागणाऱ्या एका व्यक्तीनेच दोघांनाही अकोट फ़ैल परिसरात नेत अंध असल्याच्या संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला आहे. तुझा आणि तुझ्या पतीचा चाकू भोकसून हत्या करून टाकणार, अशी धमकी देत तब्बल तीन वेळा तिच्यावर जबरी अत्याचार केला.

हे अंध दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील परतवाडा राहणारे असून त्यांना पाच वर्षाची मुलगी आहे. तर ती मुलगी लहानपणापासूनच अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (दिग्रस) इथे आजीकडे राहायची. दरम्यान मुलीच्या भेटीसाठी दोघेही ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता परतवाडा बस स्थानकावरून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. त्यात अंध दाम्पत्यमधील महिलेने तिच्या आईला फोनवर आम्ही दिग्रसला येत असल्याची कल्पना दिली. आता दिग्रस परिसरात पाऊस सुरू आहे, तुम्हा दोघांना पोहचायला रात्र होणार, त्यामुळे उद्या सकाळी या असं घरच्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघांनीही रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला होता आणि हा अत्याचार घडला…

सुरुवातीला या सर्व गोष्टींना पतीने विरोध केला असता पतीचा गळा दाबून त्याला साईडला बसून ठेवले. आणि तिला उचलून नेत परत तिच्यावर काही अंतरावर अत्याचार केला. दरम्यान पती डोळ्यांना अंध असल्यामुळे तो या गोष्टींना विरोध करू शकला नाही.

रात्री बाराच्या नंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने दोघांनाही रिक्षात बसून रेल्वे स्थानकाकडं पाठवून दिले, आणि दोघेही दिग्रसला दुसऱ्या दिवशी पोहोचले आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. काल सकाळी पती-पत्नी आणि नातेवाईक सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला सर्व प्रकाराची तक्रार नोंदवली.

नराधाम अटकेत

घटनेचे गांभीर्य पाहता सिव्हिल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी बस स्थानक परिसर तसेच जुन्या बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आणि सीसीटीव्हीच्या आधारावर त्याची ओळख पटली आणि लगेच त्याला अटक केली. गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असं अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आज या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्याची कोठडीची मागणी करणार आहेत.