Home महत्वाची बातमी साहेब हे वागणे बरे नव्हे ,,लाच घेतांना ग्रामसेवक विजय रिंढे एसीबीच्या गळाला

साहेब हे वागणे बरे नव्हे ,,लाच घेतांना ग्रामसेवक विजय रिंढे एसीबीच्या गळाला

223

3 हजाराची माघीतली होती लाच…!

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- देऊळगाव मही ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला 3 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी ग्रामसेवक 42 वर्षाचा असून त्याचे नांव विजय साहेबराव रिंढे आहे. विशेष म्हणजे बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र परिसरात हा सापळा यशस्वी झाला. देऊळगाव मही येथील एकाचे काम ग्रामसेवक यांच्याकडे होते. शेतजमीन अकृषक नसताना ग्रामपंचायतने काही अतिक्रमण धारकांना नमुना 8 दिलेले होते. हे रद्द करण्यासाठी ग्रामसेवक विजय रिंढे यांनी फिर्यादीला 3 हजार रुपये मागितले होते. रिंढे बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात होते. इथेच पैसे घेऊन या, असे रिंढे यांनी म्हटल्यानंतर फिर्यादीने सदर बाब अँटी करप्शन ब्युरो ला सांगितली. एसिबीच्या पथकाने सापळा रचला. रिंढे आले आणि त्यांनी फिर्यादीकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी पथकाने रिंढे यांना रांगेहाथ पकडले. ही कारवाई पिआय सचिन इंगळे यांच्या नेतृत्वात कर्मचारी पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, उपधीक्षक बुलढाणा संजय चौधरी यांचे होते.