Home विदर्भ अखिल भारतीय दलीत आंदोलनाची धामणगांव रेल्वेची कार्यकारणी गठीत

अखिल भारतीय दलीत आंदोलनाची धामणगांव रेल्वेची कार्यकारणी गठीत

86

अध्यक्षपदी बाबाराव इंगोले तर सचिवपदी शेख आरिफ
प्रतिनिधी धामणगांव रे.:-अखिल भारतीय दलीत अधिकार आंदोलनाची धामणगांव रेल्वे तालूका कार्यकारणीची सभा नूकतीच विश्राम भवन धामणगांव रेल्वे येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख मार्गदर्शककिसान सभेचे राज्य उपाध्यक्ष संजय मंडवधरे,राज्य सचिव मा.अशोक सोनारकर,कॉ.कैलास ठाकरे,भाकपचे ओमप्रकाश कूटेमाटे,शाहीर धम्मा खडसे,कॉ.सुनिलभाऊ घटाळे मान्यवर प्रामूख्याने उपस्थित होते,यावेळी संघटनेची धामणगांव रेल्वे कार्यकारणी गठीत करण्यात आली.अध्यक्षपदी बाबाराव इंगोले यांची तर सचिवपदी शेख आरिफ यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय दलीत अधिकार आंदोलन हे प्रामूख्याने सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता या विरूध्द संयुक्तपणे लढा उभारण्यासाठी आणि समतामूलक समाजवादी समाजाची निर्मिती करण्यासाठी ध्येय ठेवून काम करीत आहेत.समाजामध्ये आज जातीय व धार्मिक अत्याचार राजकीय छञ छायेखालीप्रमाणावर वाढत आहेत,त्याच प्रमाणे दलीत, शोषीत,पीडीत समाज हा आपल्या संविधानिक अधिकारापासून वंचित करण्यात येत आहेत.यासाठी समाजाने भक्कम अशी एकजूट उभी करण्याची गरज आहे असे प्रतिपादन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.संजय मंडवधरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर धम्मा खडसे केले.चळवळीचे काम करणे हा इच्छेचा भाग नसून ही जाणीवपूर्वक जबाबदारी झाली आहे असे प्रतिपादन शाहीर धम्मा खडसे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रतिपादन केले,यावेळी तालूका कार्यकारणी पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली.अध्यक्ष बाबाराव इंगोले,उपाध्यक्ष प्रदीप सौंदरकार,शिलानंद झामरे,सचिव शेख आरिफ शेख रफीक,सहसचिव शिरीष सडमाके,कोषाध्यक्ष बंडू शिंगणापूरे,प्रसिध्दी प्रमूख राजाभाऊ मनोहरे,सदस्य धम्मा खडसे,बंडू बावणे,पदमाकर बेलेकर,गजानन कांबळे,रमेश काळे,विश्वास कांबळे,मोहन बिंदोड,आदेश खडसे,लवेश डोंगरे,सौरभ वानखडे,प्रमोद चौरे,प्रमोद अडकणे,मनोज अडकणे,सुधाकरराव साहारे,मिंलीद अडकणे,विजय कांबळे,साहेबराव अडकणे यांची सदष्यपदी निवड करण्यात आली.