मराठवाडा

गुरे चारणाऱ्या अल्पवयीन मुलावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस सात वर्षाची शिक्षा….!

Advertisements

अमीन शाह

औरंगाबाद , दि. ०५ :- जायकवाडी धरणाच्या परिसरात म्हैस चारण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलास शिवीगाळ करत मारहाण करून त्याच्यावर अत्याचार करणा-या योगेश आडणेला दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सात वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठवली.
पैठण तालुक्यात राहणारा १५ वर्षीय मुलगा ६ ऑक्टोबर २०१८ रोजी जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये म्हैस चारण्यासाठी मित्रासोबत घेऊन गेला होता. योगेश जानकीराम आडणे (वय २४) हा तिथे आला. त्याने १५ वर्षीय मुलाच्या मित्रांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने दगड भिरकावून हकलून दिले. १५ वर्षीय मुलास पकडून ठेवत शिवीगाळ करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. पीडित मुलाच्या तक्रारीवरुन पैठण पोलीस ठाण्यात योगेश आडणे विरोधात भादंवि ३७० आणि बाल लैगिक अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन अत्याचार करणार्या योगेश आडणेला अटक केली.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली असता सहायक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी ८ साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय अधिका-यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने योगेशला दोषी ठरवून भादंवि ३७७ कलमान्वे ७ वर्षे सक्तमजूरी, २ हजार ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद. बाल लैगिक अत्याचार अधिनियम ४ नुसार ७ वर्षे सक्तमजूरी, २ हजार ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद. अधिनियम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजूरी, १ हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद. अधिनियम १२ नुसार २ वर्षे सक्तमजूरी, ७५० रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठवली.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...