Home यवतमाळ घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड..!

घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड..!

123

एका गटाची परवानगी काढून ईतर गट नंबर मधील वृक्षतोड..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : तालुक्यातील घाटंजी व पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असुन साखरा येथील एका शेतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या हद्दीतील सागवान वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र न घेताच वृक्षतोड केल्याचा आरोप होत आहे.

तसेच तालुक्यातील कापसी येथे घाटंजी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडुन एका गटाची वृक्षतोड परवानगी काढून ईतर गट नंबर मधील सागवान वृक्ष अवैध तोड करुन नदी काठी असलेल्या 30 मीटरच्या आतचे सागवान वृक्ष अवैधरित्या तोड केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत दत्त मठ, चिंचोली येथील टेकडीवर काही सागवान लाकडावर हॅमर (हतोडा) नसलेल्या सागवान लाकडाची गंजी मारलेल्या अवस्थेत दिसत आहे. तथापि, सदर सागवान लाकडाची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सदर प्रकरणात मुख्य वन संरक्षक यांनी उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी कंत्राटदार व संबंधित कर्मचारी व अधिकारी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

घाटंजी वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत वनरक्षक, वन क्षेत्र सहाय्यक, वन परिक्षेत्र अधिकारी, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, फिरत्या पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी, उप वन संरक्षक आदीं अधिकारयांचे दर ठरविणयात आलेले असुन सदर दरा नुसार रक्कम दिली नाही तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सागवान लाकडाचा पंचनामा, एनओसि, वृक्षतोड आदेश, हॅमर आदीऊ साठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अडवणुक करण्यात येते.

त्यामुळे घाटंजी तालुक्यातील अवैध वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार, वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.