Home यवतमाळ पारवा येथील वि.का.स. सोसायटीच्या निवडणूकीत यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर गटाचा भरघोस...

पारवा येथील वि.का.स. सोसायटीच्या निवडणूकीत यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर गटाचा भरघोस मतांनी विजय; तर माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, जिपचे माजी सदस्य योगेश पारवेकर गटाचा दारुन पराभव..!

126

➡️ पारवेकर गटाचे 13 पैकी 13 संचालक भरघोस मतांनी विजयी…!

(अयनुद्दीन सोलंकी)
————————
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी श्रद्धेय आबासाहेब पारवेकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गटाचे 13 पैकी 13 संचालक भरघोस मतांनी निवडून आले असून माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगेश शिवराम देशमुख पारवेकर गटाचा दारुन पराभव झाला आहे.

श्रद्धेय आबासाहेब पारवेकर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा निकाल असे;
विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र वर्गातुन गंगय्या बकन्ना बद्दीवार यांना 672 मतें मिळाली तर; कुर्ली येथील विलास राजन्ना बडगुलवार यांना 507 मतें मिळाली. विलास बडगुलवार हे 165 मतांनी पराभुत झाले आहे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातून बंडु देवराव आत्राम यांना 687 मतें मिळाली. तर गजानन गंगाराम गेडाम यांना 502 मतें मिळाली. बंडु आत्राम हे 185 मतांनी विजयी झाले आहे. महिला राखीव प्रवर्गातून लचुमबाई नाना मुद्देलवार यांना 660 मतें मिळाली. तसेच कांताबाई शंकर रेड्डीवार यांना 654 मतें घेऊन ती विजयी झाली आहे.

ईतर मागास प्रवर्गातून अशोक महादेवराव खडसे हे 659 घेऊन विजयी झालेले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगेश शिवराम देशमुख पारवेकर यांचा 134 मतांनी पराभव केला.

कर्जदार प्रतिनिधी म्हणून विजय नागोराव भोयर (636) मतें, बकन्ना लचमन्ना अंगावर (634) मतें, सचिन सुभाषचंद्र देशमुख (634) मतें, सुरेश चंद्रभान चौधरी (629) मतें, ईस्तारी राजन्ना तिप्पनवार (607) मतें, संजय वामनराव कुंभारे (538) मतें घेऊन विजयी झालेले आहे.

श्रद्धेय आबासाहेब पारवेकर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओ. एम. पहुरकर यांनी काम पाहिले. या वेळी सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक सचिन कुडमेथे, पारवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव सुरेश ईसपाडे यांनी सहकार्य केले.