Home यवतमाळ शिक्षकांनी आपल्या कर्तव्याविषयी एकनिष्ठ  राहावे – शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी

शिक्षकांनी आपल्या कर्तव्याविषयी एकनिष्ठ  राहावे – शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी

83

यवतमाळ (का.प्र.)- शिक्षकांनी आपल्या कर्तव्या विषयी एकनिष्ठ असावे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्राथ.) प्रमोद सुर्यवंशी यांनी केले. ते  तिवसा केंद्रांतर्गत दि. २९/०३/२०२३ ला जि.प. प्राथमिक शाळा वरूड इजारा येथे  आयोजित एक दिवशी शिक्षण परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रीमती दिपीका गुल्हाने यांची उपस्थिती होती तिवसा केंद्राचे केंद्रप्रमुख तथा जि.प. पतसंस्था अध्यक्ष मधुकर काठोळे , साधनव्यक्ती श्रीमती वैशाली गायकवाड,मुख्याध्यापक महेश जनबंधू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश ढोबळे, राजकुमार मुंदे, सौ. प्रिती अंबुरे, प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थितांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून शिक्षण परिषदेला सुरूवात करण्यात आली. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख मधुकर काठोळे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निपुन भारत अंतर्गत अध्ययन निष्पत्ती, महादीप, झेप या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. विस्तार अधिकारी श्रीमती दिपीका गुल्हाने, साधनव्यक्ती श्रीमती वैशाली गायकवाड, मुख्याध्यापक महेश जनबंधू यांनी अध्ययन निष्पत्ती , बालरक्षा, विविध शालेय व सहशालेय शैक्षणिक उपक्रम या विषयी मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे मधुकर काठोळे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.  शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्याम माळवे, सुदाम चव्हाण, पुंजाराम सोळंके, गणेश चौधरी,  दिवाकर खडतकर, गजानन इळपाते, वीणा काळे, उज्वला सिडाम, सुनंदा मोने, मंगेश डाफ, कुणाल सोरते  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश चौधरी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्याम माळवे यांनी मानले. या प्रसंगी तिवसा केंद्रातील शिक्षक-शिक्षिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.